Type Here to Get Search Results !

Bombay High Court Peon Cut Off 2026:कट ऑफ किती,यादी कधी येणार,नंतर काय सविस्तर माहिती

Naukari Nagar 0

 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नोकरी नगर मध्ये आज आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत तर नक्कीच बघा काय आहे.

मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती २०२६: कट ऑफ आणि निकाल अपडेट

Bombay High Court Peon Cut Off 2026:कट ऑफ किती,यादी कधी येणार,नंतर काय सविस्तर माहिती


मुंबई उच्च न्यायालयातील शिपाई/हमाल पदासाठीची स्क्रीनिंग टेस्ट (Screening Test) २६ एप्रिल २०२६ रोजी पार पडली आहे. आता उमेदवार निकालाची आणि पुढील प्रक्रियेची वाट पाहत आहेत. या परीक्षेचा अंदाजित कट ऑफ आणि निकालाबाबतची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

निकाल आणि निवड यादी कधी येणार?

 उच्च न्यायालयाच्या परीक्षांचा निकाल लेखी परीक्षेनंतर १५ ते ३० दिवसांच्या आत जाहीर केला जातो. मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात अधिकृत वेबसाईटवर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.


अपेक्षित कट ऑफ २०२६ (Expected Cut Off)

शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा ३० गुणांची होती. नियमानुसार पास होण्यासाठी किमान १५ गुण (५०%) आवश्यक असले, आणि मित्रांनो 16,17,22 पण BHC Peon Cut Off  लागू शकतो.


लेखी परीक्षेनंतर काय? (पुढील प्रक्रिया)

जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरतील, त्यांना पुढील दोन टप्प्यांना सामोरे जावे लागेल:

१. शारीरिक क्षमता आणि विशेष पात्रता चाचणी (Physical Test): ही चाचणी १० गुणांची असते. यामध्ये उमेदवाराची शारीरिक सुदृढता आणि कामाची क्षमता तपासली जाते. यात साफसफाई किंवा इतर शारीरिक कष्टाची कामे करून पाहिली जाऊ शकतात.

२. मुलाखत (Interview): हा शेवटचा टप्पा १० गुणांचा असतो. यामध्ये उमेदवाराचे व्यक्तिमत्व, बोलण्याची पद्धत आणि कामाप्रती असलेली आवड तपासली जाते.

निकालाची यादी कशी तपासायची?

१. सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईट [BHC Portal] ला भेट द्या.

 २. 'Recruitment' या टॅबवर क्लिक करा. 

३. 'Peon/Hamal Recruitment 2026' या लिंकवर जा.

 ४. तिथे 'List of Shortlisted Candidates' या लिंकवर क्लिक करून आपली यादी डाउनलोड करा.


माझा सल्ला:

जर तुम्हाला कशामध्ये काही पण अडचण येत असेल तर या मित्राला तुम्ही आठवा आणि कमेंट मध्ये सांगा.


FAQ

प्रश्न १: मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती २०२६ चा निकाल कधी लागणार? 

उत्तर: मुंबई उच्च न्यायालय शिपाई/हमाल पदाचा निकाल लेखी परीक्षेनंतर साधारणपणे १५ ते २० दिवसांत जाहीर केला जातो. मे २०२६ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात अधिकृत वेबसाईटवर निवड यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

प्रश्न २: शिपाई पदासाठी किमान किती गुण मिळवणे आवश्यक आहे?

उत्तर: जाहिरातीनुसार, लेखी परीक्षेत पात्र होण्यासाठी किमान ५०% म्हणजेच ३० पैकी १५ गुण मिळवणे अनिवार्य आहे. मात्र, पुढील फेरीसाठी निवड होण्याकरिता कट ऑफ यापेक्षा जास्त (२०+ गुण) राहू शकतो.

प्रश्न ३: मुंबई उच्च न्यायालय शिपाई परीक्षेचा अपेक्षित कट ऑफ (Expected Cut Off) काय असेल? 

उत्तर: स्पर्धा पाहता, यावर्षी ओपन कॅटेगरीसाठी अपेक्षित कट ऑफ २२ ते २५ गुणांच्या दरम्यान, तर ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी २० ते २४ गुणांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

प्रश्न ४: लेखी परीक्षेनंतर पुढची निवड प्रक्रिया काय असेल? 

उत्तर: जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरतील, त्यांना १० गुणांची 'शारीरिक क्षमता चाचणी' (Physical Test) आणि त्यानंतर १० गुणांची 'तोंडी मुलाखत' (Interview) या दोन टप्प्यांना सामोरे जावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.