नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नोकरी नगर मध्ये आज आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत तर नक्कीच बघा काय आहे.
Bombay High Court Peon 2026: शिपाई कट ऑफ Safe Zone, तुमचा यादी मध्ये नाव येणार का? नक्की बघा!
मित्रांनो!
मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) शिपाई/हमाल पदाची परीक्षा देऊन आता तुम्ही सगळे रिझल्टची आणि 'Cut Off' ची वाट पाहत असाल. "माझं सिलेक्शन होईल का?", "किती मार्क्सवर लिस्ट लागेल?" असे अनेक प्रश्न सध्या तुमच्या मनात असतील. म्हणूनच, आज आपण या पोस्टमध्ये कट ऑफचा एक अंदाज (Expected Cut Off) आणि Safe Zone बद्दल सविस्तर बोलणार आहोत.
परीक्षा कशी होती? (Short Analysis):
२६ एप्रिल २०२६ रोजी झालेली शिपाई पदाची स्क्रीनिंग टेस्ट ३० मार्कांची होती. यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण आणि स्वच्छता विषयक प्रश्न विचारले गेले होते. प्रश्नपत्रिका खूप जास्त कठीण नव्हती, पण 'Negative Marking' नसल्यामुळे कट ऑफ थोडा वर जाण्याची शक्यता आहे.
Safe Zone आणि Expected Cut Off (अपेक्षित गुण):
मित्रांनो, जर आपण मागील भरती आणि यावेळची काठिण्यपातळी पाहिली, तर खालीलप्रमाणे कट ऑफ राहू शकतो:
| Category | Expected Cut Off (30 पैकी) |
| General (Open) | 22 - 25 |
| OBC | 20 - 23 |
| SC / ST | 18 - 21 |
| EWS | 21 - 24 |
माझा सल्ला : जर तुम्हाला २० पेक्षा जास्त मार्क्स मिळत असतील, तर तुम्ही स्वतःला 'Safe Zone' मध्ये समजू शकता. अशा उमेदवारांनी आतापासूनच पुढील टप्प्यासाठी म्हणजेच 'शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता' (Physical Ability) आणि इंटरव्यू (Interview) ची तयारी सुरू करायला हरकत नाही.
पुढील निवड प्रक्रिया ( Peon Selection Process):
फक्त लेखी परीक्षा पास होऊन चालणार नाही, कारण ही फक्त पहिली पायरी होती.
लेखी परीक्षा: ३० गुण (पास होण्यासाठी किमान १५ गुण आवश्यक) आणि मित्रांनो 16,17,22 पण कट ऑफ लागू शकतो.
शारीरिक क्षमता चाचणी: १० गुण.
मुलाखत (Interview): १० गुण.
अशी एकूण ५० मार्कांची तुमची अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) तयार होईल.
महत्त्वाच्या लिंक्स (Official Links):
कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नेहमी अधिकृत वेबसाइट चेक करा:
अधिकृत वेबसाइट: High Court Of Bombay
भरती पोर्टल लिंक:
BHC Recruitment Section
काही अडचण असल्यास संपर्क साधा:
जर तुम्हाला तुमच्या अर्जाबाबत किंवा निकालाबाबत काही तांत्रिक अडचण असेल, तर तुम्ही थेट हायकोर्टाच्या हेल्पडेस्कला संपर्क करू शकता:
Email ID:
rg-bhc@nic.in(Registrar General)Helpline No.: 022-22670771 / 022-22676751 (सकाळी १०:३० ते ५:३० या वेळेत)
आमचं मत: मित्रांनो, मार्क्स थोडे कमी आले तरी खचून जाऊ नका. लिस्ट येईपर्यंत वाट पाहा आणि सोबतच इतर येणाऱ्या सरकारी भरतीची तयारी सुरू ठेवा. 'Naukri Nagar' वर आम्ही तुम्हाला अशाच अपडेट्स देत राहू.
ही माहिती तुमच्या त्या मित्रांना नक्की शेअर करा ज्यांनी ही परीक्षा दिली आहे! All the Best मित्रांनो !
Adivasi Vibhag Bharti 2026
https://www.naukarinagar.in/2026/05/adivasi-vikas-vibhag-watchman-bharti-2026.html
Nagar Parishad Bharti 2026
https://www.naukarinagar.in/2026/05/nagar-parishad-bharti-2026-details-in-marathi.html
Bombay High Court 2026 Final Answer Key
https://www.naukarinagar.in/2026/05/bombay-high-court-2026-final-answer-key.html
🔥After Diploma Best Courses👇
https://www.naukarinagar.in/2026/04/after-diploma-best-courses-marathi_01584407477.html
🔥Bombay High Court Hall Tickets 2025-26👇
https://www.naukarinagar.in/2026/04/bhc-hall-ticket-2026.html
🔥Namo Shetkari Yojana 2026👇
https://www.naukarinagar.in/2026/04/namo-shetkari-status-2026.html
🔥RBI Hall Tickets Download👇
https://www.naukarinagar.in/2026/04/rbi-hall-ticket-2026.html
🔥Bombay high Court 2026 1 Month Strategy👇
🔗https://www.naukarinagar.in/2026/03/bombay-high-court-2026-strategy-marathi.html
🔥Talathi Bharti 2026 Latest Updates 👇
https://www.naukarinagar.in/2026/04/talathi-bharti-2026-latest-update.html
BA नंतर सरकारी नोकरी २०२६
https://www.naukarinagar.in/2026/04/ba-nantar-sarkari-naukri-2026.html
Mumbai High Court Bharti 2026
https://www.naukarinagar.in/2026/03/mumbai-high-court-bharti-2026.html
Arogya Vibhag Bharti 2026
https://www.naukarinagar.in/2026/03/arogya-vibhag-bharti-2026-maharashtra.html
Daru Bandi Bharti 2026
After Diploma Best Courses
FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)
१. मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती २०२६ चा निकाल कधी जाहीर होणार?
मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई/हमाल पदाचा निकाल सामान्यतः परीक्षेपासून १ ते १.५ महिन्याच्या आत अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला जातो. निकाल जाहीर होताच त्याची लिंक आमच्या 'Naukri Nagar' टेलिग्राम चॅनलवर अपडेट केली जाईल.
२. शिपाई पदासाठी पासिंग मार्क्स किती आहेत?
अधिकृत नियमांनुसार, ३० मार्कांच्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये पास होण्यासाठी उमेदवाराला किमान १५ गुण (५०%) मिळवणे आवश्यक आहे. मात्र, निवडीसाठी कट ऑफ यापेक्षा जास्त लागू शकतो.
३. लेखी परीक्षेनंतर पुढची प्रक्रिया काय असेल?
जे उमेदवार लेखी परीक्षेत (Screening Test) पात्र ठरतील, त्यांना शारीरिक क्षमता चाचणी (Physical Test) आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखतीसाठी (Interview) बोलावले जाईल. या दोन्ही फेऱ्या प्रत्येकी १० गुणांच्या असतील.
४. कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे का?
प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी आणि एकूण जागांच्या तुलनेत अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या यावर कट ऑफ अवलंबून असतो. यावर्षी प्रश्न सोपे असल्याने कट ऑफ २०-२५ च्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता आहे.
%20(2).jpg)
