परीक्षा तारीख आणि हॉल तिकीट (Exam Date & Hall Ticket Update)
मित्रांनो, कोणत्याही सरकारी भरतीचा फॉर्म भरला की मनात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे— "परीक्षा नक्की कधी होणार?" मुंबई उच्च न्यायालयाच्या परीक्षांची पद्धत थोडी वेगळी असते, त्यामुळे खालील तुमच्या मनात परीक्षेबद्दल जे काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे खाली दिली आहेत समजून घ्या:
अ) परीक्षा कधी होणार? (महत्वाची तारीख)
मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात आल्यानंतर साधारणपणे लेखी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा २६ एप्रिल २०२६ होण्याची दाट शक्यता आहे.
लक्षात ठेवा: न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जसा बदल होईल, तसे आम्ही 'नोकरी नगर' (Naukri Nagar) वर लगेच अपडेट करू. त्यामुळे ही पोस्ट 'बुकमार्क' करून ठेवा!
ब)हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची पद्धत?
तुमचे हॉल तिकीट परीक्षेच्या ७-१० दिवस आधी तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाऊनलोड करता येईल.. हॉल तिकीट कसं डाऊनलोड करायचं? ते या सोप्या स्टेप्समध्ये पहा::
सर्वात आधी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत पोर्टलवर (
bombayhighcourt.nic.in) जावे लागेल.तिथे 'Recruitment' सेक्शनमध्ये जाऊन तुमच्या पदाच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचा Registration ID आणि Password (जो तुम्ही फॉर्म भरताना तयार केला होता) टाकून लॉगिन करा.
तुमचे हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंट काढून घ्या.
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
१. मुंबई उच्च न्यायालय भरती २०२६ साठी वयोमर्यादा काय आहे? उत्तर: साधारणपणे १८ ते ३८ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासनाच्या नियमानुसार ५ वर्षांची सूट दिली जाते.
२. शिपाई (Peon) पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे? उत्तर: शिपाई किंवा हमाल पदासाठी उमेदवार किमान ७ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही विशिष्ट जागांसाठी १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे असते.
३. लिपिक (Clerk) पदासाठी टायपिंग सर्टिफिकेट अनिवार्य आहे का? उत्तर: हो, क्लर्क पदासाठी टायपिंग सर्टिफिकेट तर लागतंच, पण तुमची टायपिंगची स्पीड चांगली असणं निवडीसाठी जास्त महत्त्वाचं ठरतं
४. मुंबई उच्च न्यायालय भरतीची परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन? उत्तर: या भरतीची प्राथमिक चाचणी सहसा ओएमआर (OMR) आधारित ऑफलाईन किंवा टीसीएस/आयबीपीएस (TCS/IBPS) मार्फत ऑनलाईन घेतली जाते. अधिकृत जाहिरातीमध्ये याची स्पष्ट माहिती दिली जाते.
५. परीक्षेचे हॉल तिकीट कधी उपलब्ध होईल? उत्तर: परीक्षेच्या साधारणपणे ७ ते १० दिवस आधी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते.
सल्ला: "मित्रांनो, अनेकदा परीक्षेच्या आदल्या दिवशी सर्व्हर डाऊन होतो, त्यामुळे हॉल तिकीट आल्या आल्या त्याची प्रिंट काढून ठेवा.
मुंबई हायकोर्टाचे वैशिष्ट्य: हायकोर्टाची भरती प्रक्रिया इतर भरतींच्या तुलनेत थोडी शिस्तबद्ध आणि वेगवान असते, त्यामुळे वेळेचे नियोजन नीट करा.
परीक्षेच्या दिवशी सोबत काय न्यावे?
जर याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करा
हे देखील वाचा:
Bombay high Court 2026 1 Month Strategy
https://www.naukarinagar.in/2026/03/bombay-high-court-2026-strategy-marathi.html
Talathi Bharti 2026 Latest Updates
https://www.naukarinagar.in/2026/04/talathi-bharti-2026-latest-update.html
BA नंतर सरकारी नोकरी २०२६
https://www.naukarinagar.in/2026/04/ba-nantar-sarkari-naukri-2026.html
Mumbai High Court Bharti 2026
https://www.naukarinagar.in/2026/03/mumbai-high-court-bharti-2026.html
Arogya Vibhag Bharti 2026
https://www.naukarinagar.in/2026/03/arogya-vibhag-bharti-2026-maharashtra.html
%20(2).jpg)
